बलात्कारी नराधमास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

बलात्कारी नराधमास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या परप्रांतीय व्यक्तीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी सुनावली.

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

छबी मोहन सोनी (वय 25, रा. किरकटवाडी, मूळ उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत किरकटवाडी येथे हा प्रकार घडला. याबाबत पीडितेच्या आईने हवेली पोलिसांत फिर्याद दिली होती. विशेष सरकारी वकील अरुंधती ब—ह्मे यांनी या प्रकरणात आठ साक्षीदार तपासले. पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस फौजदार विद्याधर निचित यांनी काम पाहिले, तर न्यायालयीन कामासाठी हवालदार सचिन अडसूळ आणि नाईक किरण बरकाले यांनी मदत केली.

Kirit Somaiya : अनिल परबांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी : किरीट सोमय्या

पीडित आठ वर्षांपूर्वी खानावळीचा डबा देत असल्याने सोनी तिच्या ओळखीचा होता. जास्तच ओळख निर्माण झाल्यानंतर पीडित, तिची आई, भाऊ आणि सोनी एकाच खोलीत राहत होते. रेशन, घरभाडे भरण्यास तो मदत करत असे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने पीडितेवर बलात्कार केला. पीडित गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी

भरपाईची सूचना

राज्य सरकारच्या पीडितेला मदत देण्याच्या योजनेनुसार या प्रकरणातील पीडितेला मदत देण्याच्या सूचना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला देण्यात आल्या आहेत. दोन लाख किंवा नियमात बसत असेल तर त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई पीडितेला देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

Back to top button