नाशिक : कारवर आदळून युवतीचा मृत्यू ; कारचालकाविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : कारवर आदळून युवतीचा मृत्यू ; कारचालकाविरोधात गुन्हा

नाशिक : रस्त्याच्या वळणावर चुकीच्या पद्धतीने कार उभी केल्यामुळे कारवर आदळून युवतीचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी फाट्याजवळील हॉटेल सेलिब्रेशनजवळ घडली. अक्षदा दत्तू धुमाळ (26, रा. हनुमानवाडी) असे या युवतीचे नाव आहे.

दरम्यान, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात एमएच 15, डीसी 6865 क्रमांकाच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षदा दि. 16 मे रोजी रात्री पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावच्या दिशेने जात होती. त्यावेळी वळणावर एकाने इंडिकेटर सुरू न करता कार उभी केली होती. त्यावर अक्षदाची दुचाकी आदळल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

Back to top button