

नांदगाव (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : खून झालेल्या तरुणाचे संशयीत आरोपींच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबध असल्या कारणावरून मयत तरुणास वरातीतून बोलवून घेतले. त्यानंतर त्याला मद्यापान करून त्याचा दोरीने गळा आवळून जिवेमारले. नंतर त्याचे हात पाय दोरीने बांधून नाग्यासाक्या धरणात फेकून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या घटनेतील मयत व संशयित हे तालुक्यातील नांदूर येथील रहिवाशी आहेत.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत अमोल धोंडीराम व्हडगर (वय २२) याचा संशयीत आरोपी गोविंदा वाळुबा केसकर, चैतन्य (सोनु) साहेबराव केसकर यांच्या नात्यातील महिलेशी जबरदस्तीने अनैतिक संबध ठेल्याच्या कारणावरून खुन झाला. दरम्यान मयत अमोल यास या बाबत वेळोवेळी समजावून देखील अमोलने त्याकडे दुर्लक्ष केले. दि २२ रोजी लग्नाच्या वरातीत संशयीत आरोपींनी अमोलला बाजूला बोलवून घेत त्याला नांदूर येथून नाग्यासाक्या धरणाच्या बाजूला घेऊन गेले. त्याला तेथे मद्य पाजून संगनमताने दोरीने गळा आवळून जिवे मारले. नंतर त्याच दोरीने अमोलचे हात पाय बांधून त्याचे मृतदेह धरणात टाकून तेथून पसार झाले.
दरम्यान २३ रोजी मयत अमोल घरी आला नाही, म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला व बेपत्ता असल्याची पोलिसात फिर्याद दिली. दि २४ रोजी नाग्यासाक्या धरणात एक मृतदेह नागरिकांना दिसले. त्याची माहिती पोलिसांना कळाली. या घटनेचा नांदगाव पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान पोलिसांनी तपास यंत्रणा हलवून संशयीत आरोपींना जेरबंद केले.