नाशिक : कारमधून लांबवली पाच लाखांची रोकड | पुढारी

नाशिक : कारमधून लांबवली पाच लाखांची रोकड

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
बँकेत भरणा करण्यासाठी कारमध्ये ठेवलेली तब्बल पाच लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना गंगापूर राेडवरील थत्तेनगरपासून जुना आडगाव नाका दरम्यान मंगळवारी (दि. २४) दुपारच्या सुमारास घडली. याबाबत आडगाव नाक्यावरील सम्राट वृंदावन सोसायटीत राहणाऱ्या मधुकर शंकर टिळे (६०) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.२४ ) दुपारी मधुकर टिळे हे कारमध्ये (एमएच १५ ए च एन ९५९५) गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथे बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना कारमध्ये ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यावर त्यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

हेही वाचा :

Back to top button