नाशिकचे पृथ्वीराज पाटील अमेरिकेत अपघातात पत्नीसह ठार | पुढारी

नाशिकचे पृथ्वीराज पाटील अमेरिकेत अपघातात पत्नीसह ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील यांचा मुलगा पृथ्वीराज व सून सावनी यांचा अमेरिकेत कार अपघातात मृत्यू झाला.

डॉ. राजश्री पाटील यांचा मुलगा पृथ्वीराज (32) आणि सून सावनी (30) यांचा रविवारी रात्री अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे कार अपघात झाला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान सोमवारी (दि.23) दोघांचाही मृत्यू झाला. पृथ्वीराज हे कॅलिफोर्निया येथील अ‍ॅपल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी सावनी या तेथे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करीत होत्या. दोघांचा गेल्या डिसेंबरमध्ये म्हणजे अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच डॉ. राजश्री पाटील या पतीसह कॅलिफोर्निया येथे पोहोचल्या आहेत. तर त्यांची मुलगीही तेथेच वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. पृथ्वीराज व सावनी यांच्या पार्थिवावर कॅलिफोर्निया येथेच अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button