Nashik : दिंडोरीतील प्रत्येक गावात ‘जलजीवन’ राबवणार : ना. डॉ. भारती पवार | पुढारी

Nashik : दिंडोरीतील प्रत्येक गावात ‘जलजीवन’ राबवणार : ना. डॉ. भारती पवार

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील प्रत्येक गावात टप्प्याटप्प्याने जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत, जलशक्ती मंत्रालय व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यात नळ पाणीपुरवठा योजना कामांचे भूमिपूजन ना. पवार यांच्या हस्ते ढकांबे येथे झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. (Nashik)

ना. पवार म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात 32 गावांमध्ये 25.27 कोटींची पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू होत आहेत. पुढील टप्प्यात 40 गावांमध्ये 40 कोटींची योजना पूर्ण करण्यात येईल. तसेच कोरोना काळात केंद्राने खूप मोठे कार्य केले. 191 कोटी लसीकरण पूर्ण झाले, ही अभिमानाची बाब आहे. महिला सुरक्षा, आरोग्य, उज्ज्वला योजना, जनधन योजना, रेशन याबाबत विविध कामे केंद्राने केल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी तहसीलदार पंकज पवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, कृषी अधिकारी विजय पाटील, रेशन दुकानदार फेडरेशनचे अध्यक्ष गणपतराव डोळसे – पाटील, मनीषा बोडके, नरेंद्र जाधव, श्याम बोडके, योगेश तिडके, योगेश बर्डे, शैलेश धात्रक, गणेश बोडके, अमोल खोडे, पंढरीनाथ पिंगळे आदी उपस्थित होते. लक्ष्मण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. (Nashik)

या गावांना लाभ
जांबुटके, फोफशी, पिंप्रीअंचला, धाऊर, लोखंडेवाडी, अंबानेर, टेटमाळ, सोनजांब, कोर्‍हाटे, शिवनई, निळवंडी – अंबाड, पालखेड (बं.), रवळगाव, ननाशी, करंजवण, ढकांबे, दहेगाव, चारोसा, करंजाळी, तिसगाव, चाचडगाव, नळवाडी, दगडपिंप्री, जोपूळ, वणी (खुर्द), मानोरी, खडक सुकेणे, बोपेगाव, कोचरगाव, दहिवी, पळसविहीर

हेही वाचा :

Back to top button