

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्काबुक्की करण्याची कुरापत काढून चौघांनी मिळून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना बजरंगवाडी परिसरात घडली. संकेत नंदकिशोर तोरडमल (२१, रा. बजरंगवाडी) हा युवक जखमी झाला आहे.
संकेतच्या फिर्यादीनुसार तो मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात गुरुवारी (दि.१९) रात्री सव्वा दहाच्या सुमारास बजरंगवाडी येथील सातमाऊली मंदिराजवळ नाचताना संशयित अक्षय देविदास जाधव, ज्ञानेश्वर गंगाधर दिवे, प्रविण मोहन पीठे व रुपेश मधुकर पीठे (चौघे रा. बजरंगवाडी) यांनी कुरापत काढून मारहाण करीत अक्षयने कोयत्याने वार करीत गंभीर दुखापत केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.