नाशिक : सिन्नर येथे मोटारसायकल गॅरेजला पिकअपची धडक; दोन जखमी | पुढारी

नाशिक : सिन्नर येथे मोटारसायकल गॅरेजला पिकअपची धडक; दोन जखमी

सिन्नर ; पुढारी वृत्तसेवा : सिन्नर येथील वावी वेस भागात शिर्डीकडे जाणाऱ्या पिकअप जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट एका मोटारसायकल गॅरेजमध्ये धडकले. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी (दि.17) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

वावी वेस भागात दोस्ती ट्रेडर्सच्याजवळ एक मोटारसायकल गॅरेज असून गॅरेजमधील फिटर मोटारसायकल दुरुस्तीचे काम करत होते. अचानक पिकअप (एमएच 17 एजी 3426) गॅरेजवर धडकली. तीन ते चार मोटारसायकलचे देखील नुकसान झाले आहे. ही पिकअप काही मजुरांना घेऊन शिर्डीकडे जात होती. जखमींना तातडीने उपचारांसाठी खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा

Back to top button