नाशिक : पंचवटीतील नऊ वर्षीय मुलाची आत्महत्या | पुढारी

नाशिक : पंचवटीतील नऊ वर्षीय मुलाची आत्महत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील अवधूत वाडी येथे राहणाऱ्या नऊ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आर्यन कांबळे (रा. अवधूत वाडी, पंचवटी) असे या मुलाचे नाव आहे. रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आर्यन याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आर्यन हा आई व भावासोबत राहत होता. त्याची आई खासगी रुग्णालयामध्ये तर भाऊ मॉलमध्ये काम करतो.

हेही वाचा :

Back to top button