बेडूक म्हणणार्‍यांबरोबर युती कशी? : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा सवाल | पुढारी

बेडूक म्हणणार्‍यांबरोबर युती कशी? : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा सवाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे नेते गिरीश महाजन सातत्याने शिवसेनेवर टीका करतात. शिवसेनेला बेडूक म्हणणार्‍या पक्षासोबत जिल्ह्यात कशी युती करता? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. त्याचवेळी शिवसेना बेडूक आहे की हत्ती आहे, हे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी महाजनांना दाखवत त्यांना इंगा दाखवावा, असे आवाहनही खडसे यांनी केले.

खडसे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना असे चित्र असले तरी जळगावमध्ये मात्र समीकरण वेगळे आहे. गिरीश महाजन यांची जळगावमध्ये शिवसेनेशी छुपी युती आहे. गिरीश महाजन हे जळगावच्या पालकमंत्र्यांसोबत चहा पितात, जेवण करतात. या शिवसेना नेत्यांसोबत त्यांची कायम उठबस असते. ते शिवसेनेला बेडूक म्हणत असतील तर ते बेडकासोबत कसे काय जातात, असा सवालही खडसे यांनी केला. दरम्यान, गिरीश महाजनांनी धुळ्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अटलजींची भाजप आता उरली नाही, या टीकेला उत्तर दिले होते.

हेही वाचा :

Back to top button