नाशिकमधील शिंदे येथे युवकाची आत्महत्या | पुढारी

नाशिकमधील शिंदे येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : राहत्या घरातील छताच्या लाकडी खांबाला दाेरीच्या सहाय्याने गळफास घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना शिंदेगाव मराठी शाळेच्या पाठीमागे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश देविदास गिरी (२१) याने राहत्या घरात गळफास घेतला. त्याला उपाचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button