मालेगाव : ‘त्या’ आदेशाविरोधात पती-पत्नीचं आपल्या लेकरांसह धरणे आंदोलन | पुढारी

मालेगाव : 'त्या' आदेशाविरोधात पती-पत्नीचं आपल्या लेकरांसह धरणे आंदोलन

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

धार्मिक स्थळांपासून 200 मीटर अंतराव थांबण्यास मनाईचा उपविभागीय दंडाधिकारी यांना काढलेल्या आदेशाविरुद्ध येथील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांनी बुधवारपासून सहकुटुंब अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

शिर्के यांच्या घरापासून नवदुर्गा माता मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर अवघे तीन मीटर अंतरावर असल्याने शिर्के घरी असतानादेखील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाचे सतत उल्लंघन होत राहील, अशी स्थिती आहे. पोलिसांनी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे व मिळालेल्या माहितीची कोणतीही शहानिशा न करता उपरोक्त आदेश काढण्यात आला असून, त्यामुळे राहण्याचा व उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत उपविभागीय दंडाधिकारी यांचे शासकीय निवासस्थानात राहण्याची व उपजीविकेसाठी प्रांत कार्यालयाचा परिसर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिर्के यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button