नाशिक : शहरातून 14 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त | पुढारी

नाशिक : शहरातून 14 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परराज्यात तयार केलेला व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. द्वारका परिसरात केलेल्या कारवाईत पथकाने सुमारे 14 लाख रुपयांचा मद्यसाठा व 10 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 24 लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे विभागीय पथकाने ही कारवाई केली. पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक अ. गो. सराफ, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर आदींच्या पथकाने मंगळवारी (दि.10) द्वारका सर्कलजवळ सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद ट्रक (एमएच 48, टी 1628) येताना पथकास दिसला. त्यानुसार पथकाने ट्रक पकडून पाहणी केली असता त्यात परराज्यातील एक हजार 310 लिटर विदेशी मद्य व 1200 लिटर बिअर असा मुद्देमाल आढळून आला. पथकाने ट्रकचालक मोहनलाल भागीरथ बिश्नोई (35, रा. राजस्थान) यास पकडले आहे.

विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हा मद्यसाठा धुळे जिल्ह्याच्या दिशेने जात होता. चालकाकडील चौकशीतून मद्यसाठा नाशिकमध्ये आणला होता की, इतर ठिकाणी नेला जात होता याचा उलगडा होणार आहे. मुख्य सूत्रधारांकडून ठरावीक अंतरानंतर वाहनाच्या चालकांची बदली होत असल्याने त्यांची भूमिका व कामाची जबाबदारी वेगवेगळी असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button