नाशिक : कुरापत काढून 17 वर्षीय युवकावर धारदार हत्याराने वार | पुढारी

नाशिक : कुरापत काढून 17 वर्षीय युवकावर धारदार हत्याराने वार

नाशिक : कुरापत काढून एकाने १७ वर्षीय युवकावर धारदार हत्याराने वार केल्याची घटना तिडके कॉलनीत घडली. याप्रकरणी जयश्री लक्ष्मण शिरसाठ (रा. तिडके कॉलनी) यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात संदेश नामदेव झाल्टे (४०, रा. मिलींद नगर) विरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. जयश्री यांच्या फिर्यादीनुसार संशयित संदेशने सोमवारी (दि.९) सकाळच्या सुमारास कुरापत काढून सौरभ शिरसाठ याच्यावर हल्ला करून त्यास दुखापत केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button