नाशिक : स्मार्ट सिटिझन पुुरस्कारांचे वितरण; स्मार्ट सिटी फाउंडेशनची स्थापना | पुढारी

नाशिक : स्मार्ट सिटिझन पुुरस्कारांचे वितरण; स्मार्ट सिटी फाउंडेशनची स्थापना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक स्मार्ट सिटी फाउंडेशनची स्थापना व कार्यकारिणीचा शपथविधी उत्साहात पार पडला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते नाशिक स्मार्ट सिटिझन गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष जयंत येवला यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सेवेची आवड असणार्‍या व्यक्तींना एकत्र आणून नाशिक स्मार्ट सिटी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. प्रमोद परसरामपुरीया यांनी सभासदांना शपथ दिली. नवीन कार्यकारिणीची निवड करताना संपूर्ण कारभार महिलांनी पाहावा, असा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष म्हणुन स्मिता राणे, सचिव म्हणून पल्लवी रकिबे, तर खजिनदारपदी शीतल मुरकेवार यांची एकमताने निवड करण्यात आली. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तीन व्यक्तींना नाशिक स्मार्ट सिटिझन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यंदा धावपटू संजीवनी जाधव, गडकिल्ले व जल, वनसंवर्धन क्षेत्रातील रोहित जाधव, अभिनेत्री पूजा गोरे वर्तक यांना या पुरस्काराने नीलिमा पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. फाउंडेशनने वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिशा व तन्मय जोशी, काजल व दिग्विजय सिंग यांची परिश्रम घेतले. अशोक वनारा, राजेंद्र कोठावदे, प्रमोद मुरकेवार, प्रमोद पाटील, विलास लिदुरे, राकेश सिंग, विवेक रकिबे, मनोज बागूल, प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. राहुल देशमुख उपस्थित होते. वासंती वनारा, ऐश्वर्या बागूल यांनी सूत्रसंचालन केले.

गरीब विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप : यावेळी स्वामी कंठानंदजी यांनीही मार्गदर्शन केले. त्यांच्या मठाला तीन सायकल देण्यात आल्या. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके, अपंग व्यक्तीस व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे सदस्य भरत पाटील, देवेंद्र राणे व रवींद्र झोपे यांनी सायकल उपलब्ध करून दिल्या.

हेही वाचा :

Back to top button