

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय पिंपळनेर व साक्री पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आधार केंद्राचे उद्घाटन साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जि.प.सदस्या सुधामती गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात झाले.
यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शुभांगी बनसोडे, युवक कॉंग्रेसचे पंकज सूर्यवंशी, पं. स. सदस्य धुडकु भारुडे, शामकांत पगारे, पर्यवेक्षीका सोनल देसले, पिंपळनेर प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनिस, महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आधार केंद्रा मार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील लहान बालकांना तसेच गरोदर व स्तनदा माता, नवीन लग्न झालेले महिलांना मोफत आधार कार्ड काढून मिळणार आहे. प्रकल्पातील महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती सूर्यवंशी यांनी केले आहे.