नाशिक : मनमाड-मुंबई गोदावरी स्पेशल ट्रेन 30 जूनपर्यंत धावणार | पुढारी

नाशिक : मनमाड-मुंबई गोदावरी स्पेशल ट्रेन 30 जूनपर्यंत धावणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा : मनमाड-मुंबई गोदावरी स्पेशल ट्रेन (गाडी क्र. 02101/02102) प्रायोगिक तत्त्वावर 35 दिवसांसाठी सुरू झाली. तिची मुदत 15 मेपर्यंत होती. ती 30 जूनपर्यंत वाढविल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीड महिन्याच्या वाढीव कालावधीत गोदावरी स्पेशल ट्रेनच्या एकूण 92 फेर्‍या होतील, अशी माहिती भुसावळचे डीआरएम एस. एस. केडिया यांनी टि्वटरद्वारे दिली.

जनमताचा रेटा वाढल्याने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी गोदावरीसाठी रेल्वेमंत्र्यांकडे प्रयत्न केले होते. रेल्वेने गोदावरी ट्रेनला स्पेशल ट्रेन असे नाव देत, ती 11 एप्रिल ते 15 मे अशी 35 दिवसच चालविण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गोदावरी ही पंचवटी आणि मुंबईतील लोकलप्रमाणे इंटरसिटी ट्रेनचा दर्जा असणारी आहे. नवीन गोदावरी ही स्पेशल व सुपरफास्ट ट्रेन आहे. सध्या गोदावरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही गाडी सुरू करण्यासाठी मासिक पासधारक व प्रवासी वेलफेअर असोसिएशनचे राजेश फोकणे, किरण बोरसे, संजय शिंदे, कैलास बर्वे, उज्ज्वला कोल्हे, नितीन जगताप, सुदाम शिंदे आदींनी रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्याचे फलित म्हणून या गाडीस मुदतवाढ मिळाली आहे.

हेही वाचा :

Back to top button