नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा :
येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नाशिकरोड परिसरातील रोकडो वाडीतील मारुती मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यात आली. पहाटे पाच वाजेच्या सुमाराला गनिमी काव्याने हनुमान चालीसा पठण करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे नाशिकरोडला हनुमान चालीसा पठण झाली. विशेष म्हणजे नाशिकरोडच्या मशिदीत मुस्लिम बांधवांनी अजान पठण केली नाही.
त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी देखील मशिदी समोर हनुमान चालीसा पठण केले नाही. त्याऐवजी त्यांनी रोकडोवाडीत हनुमान चालीसा म्हटली. याविषयी बोलताना नाशिकरोड मनसे अध्यक्ष विक्रम कदम म्हणाले की, राज ठाकरे यांचा आदेश आम्ही पाळला आहे. नाशिकरोडला मशिदीत भोंग्यावर अजान म्हटली नाही. त्यामुळे आम्हीही मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हटली नाही. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद साखरे यांनी आम्ही हनुमान चालीसा पठण करताना कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, असा दृषटीकोण समोर ठेवला होता. पोलीसांना सहकार्य होईल अशीच आमची भूमिका असल्याचे म्हटले. याप्रसंगी विभाग अध्यक्ष विक्रम कदम, प्रमोद साखरे, प्रकाश बंटी कोरडे, संतोष सहाणे किशोर अण्णा जाचक, रोहन देशपांडे, बाजीराव मते, विनायक पगारे आदी. उपस्थित होते.