नाशिक : पैसे देण्यास नकार दिल्याने युवकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली | पुढारी

नाशिक : पैसे देण्यास नकार दिल्याने युवकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली

नाशिक (सातपूर) : युवकाला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार सातपूरमध्ये घडला. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूरच्या जाधव संकुल परिसरात गणेश कृपा मेडिकल येथून अमोल देवकर हा तरुण पायी जात होता. अक्षय पाटील, अक्षय भंगाळे, मनोज लोंढे आणि कुणाल या संशयितांनी देवकर यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र अमोलने पैसे देण्यास नकार देताच चारही संशयितांनी अमोल याच्या डोक्यात काचेची बाटली फोडत त्याला मारहाण करून त्याचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला.

या घटनेतील संशयित आरोपी अक्षय पाटील याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अक्षय पाटील याची तडीपारी संपली असून तो सातपूरमध्ये परतला आहे.

हेही वाचा :

Back to top button