नाशिक : सातपूर पोलिस दलातर्फे सशस्त्र संचलन | पुढारी

नाशिक : सातपूर पोलिस दलातर्फे सशस्त्र संचलन

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा :
रमजान ईद उत्साहात आणि शांततेत पार पडावी आणि कायद्याचे काटेकोर पालन व्हावे. यासाठी सातपूर पोलीस दलातर्फे सशस्त्र संचलन करण्यात आले.
येत्या काही दिवसांत  रमजान ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे. हा सण मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करावा. त्याचबरोबर कायद्याचेही पालन व्हावे.  सण, उत्सव काळात समाजकंटकांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा या संचलनाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे देण्यात आला. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी केले.
दरम्यान, सातपूर पोलीस ठाण्यापासून संचलनास प्रारंभ झाला.  सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. स्वारबाबा नगर, राजवाडा, शिवाजी चौक, शनिमंदिर, श्री छत्रपती शिवाजी मार्केट आदी परिसरातून संचलन करण्यात आले. या संचलनात पोलीस अधिकारी शीघ्र कृती दलाचे जवान, सीआरपीएफ पथक, सातपूर पोलीस ठाणे गृह रक्षक दलाचे जवान आदीसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button