जळगाव : आठ वर्षांपासून तरुणीवर अत्याचार ; संशयित तरुणाच्या आई-बहिणीसह सात जणांविरोधात गुन्हा | पुढारी

जळगाव : आठ वर्षांपासून तरुणीवर अत्याचार ; संशयित तरुणाच्या आई-बहिणीसह सात जणांविरोधात गुन्हा

जळगाव पुढारी वृत्तसेवा : शहरातील २२ वर्षीय तरूणीवर ती अल्पवयीन असल्यापासून त्यापुढील आठ वर्ष सतत अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहत आहे. ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याची ओळख मुलीशी झाली. त्याने शाळेत होणा-या विविध कार्यक्रमांच्या वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल’.

त्यावेळी तरूणी अल्पवयीन होती. तीला गाडीवर जबरदस्ती बसवून सोबत रीतेशचा मित्र बंटी आणि राहुल हे देखील होते. इंजिनघाट परिसरात तिला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. तर बंटी आणि राहुल यांनी फोटो काढले.  ‘तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करील’ अशी धमकी दिली. त्याचप्रमाणे रितेशची आई शोभा बाविस्कर आणि बहीण यांनी मुलीला घरातून पैसे चोरून आणण्यास सांगितले.

हा प्रकार गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू होता. याचदरम्यान मुलगी २२ वर्षाची झाली असताना तिच्या नातेवाईकांनी तिचा लग्नाचा विषय सुरू केला. हा विषय रितेशला समजल्यानंतर त्याने १९ एप्रिल रोजी तरुणीला कॉलेजमधून गाडीवर बसून घेऊन बिग बाजार येथे जळगावला आणले. या ठिकाणी देखील विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केला आणि ‘मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल’ अशी धमकी दिली.

रितेश च्या छळाला व अत्याचाराला कंटाळून तरुणीने अखेर सोमवारी (दि. २५)  एप्रिल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रितेश सुनील बाविस्कर, त्याची आई शोभा सुनील बाविस्कर, त्याची बहीण नंदनी राहुल कोळी, त्याचे वडील सुनील बाविस्कर सर्व रा. भुसावळ, मित्र उर्वेश पाटील बंटी आणि राहुल (पुर्ण नावे माहित नाही) अशा ७ जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button