नाशिक : हरसूलला खैर तस्करी रोखली ; ट्रक्टरचालकासह साथीदार फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर ) परिसरात सोमवारी (दि. 25) मध्यरात्री खैर लाकडाची अवैधरीत्या होणारी वाहतूक वनविभागाने रोखली. या कारवाईत वनविभागाने एका ट्रॅक्टरसह 20 हजारांचे खैर जप्त करण्यात आले आहे. मात्र, ट्रॅक्टरचालकासह त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
देवडोंगरा नियतक्षेत्रातील हेदपाडा-कास रस्त्यावर अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती वनविभागाला मिळाला. त्या आधारे वनकर्मचार्यांनी सापळा रचून ट्रॅक्टर (एमएच 14 ईएस 0605) व ट्रॉली (एमएच 04 बी 4910) पकडला. त्यामध्ये 20 हजार रुपये किमतीचे 21 घनमीटर खैराचे लाकूड जप्त करण्यात आले. वनपथकाची कुणकुण लागताच ट्रॅक्टरचालकासह साथीदारांनी ट्रॅक्टर सोडून पोबारा केला. जप्त केलेल्या ट्रॅक्टर व गोपनीय आधारे वनविभागाने तपास सुरू आहे. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. एन. मौळे, आर. एस. कुवर, एम. एल. पवार, पी. पी. नाईक, के. एस. गवळी, आर. एम. गवळी, संजय भगरे आदी सहभागी झाले होते.
हेही वाचा :
- सीमा प्रश्नाची दखल
- विदर्भात वर्धा सर्वाधिक हॉट, पारा ४५ अंश सेल्सिअस
- नाशिक : वादग्रस्त उड्डाणपुलांना अखेर पालकमंत्र्यांकडून ब्रेक