ऑनलाइन जुगारात होरपळ

रौलेट,www.pudhari.news
रौलेट,www.pudhari.news
Published on
Updated on

एक शून्य शून्य – गौरव अहिरे 

रौलेटमुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला, तर अनेक तरुणांनी रौलेटच्या जाळ्यातून सुटका करण्यासाठी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे रौलेटचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर कायदा व अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांकडून रौलेट जुगार खेळवणार्‍यांवर गुन्हे दाखल होत असले तरी रौलेटचा खेळ बिनदिक्कत सुरू असल्याने आजही अनेकांचे संसार रौलेटच्या आकड्यांमुळे कोलमडण्याची भीती आहे.

ग्रामीण पोलिसांनी रौलेटमधील सूत्रधार कैलास शहा याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. त्यामुळे रौलेट खेळवणार्‍यांवर अंकुश येईल, असा विश्वास पोलिसांना आहे. मात्र, हा ऑनलाइन जुगार एका आरोपीपर्यंत मर्यादित नसल्याने तो समूळ नष्ट करण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची झाली आहे. आज जाहिरातींच्या माध्यमातून अनेक ऑनलाइन खेळांमधून नागरिकांना आर्थिक फायद्याचे आमिष दाखवत आहेत. त्या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक ऑनलाइन खेळाकडे आकर्षिक होत आहेत. सुरुवातीला मोजक्या नफ्यात खूश होऊन जास्तीत जास्त रक्कम गुंतवणूक करून युवावर्ग ऑनलाइन पैसे हरत आहेत. त्यात रौलेट जुगाराचाही समावेश आहे. रौलेटमध्ये जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील एका तरुण शेतीविक्रीतून आलेले लाखो रुपये हरला होता. त्यानंतर पैसे वसुलीच्या चिंतेने त्याने आत्महत्या केली. त्याचप्रमाणे तेथीलच एका युवकाला रौलेटची सवय लावून उधारीत त्याला खेळू दिले. त्यानंतर त्याच्याकडून पैशांचा तगादा लावण्यात आला. त्यामुळे त्या युवकानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत येथील एका तरुणाने रौलेटमध्ये 45 लाख रुपये गमावले.

अशा प्रकाची अनेक उदाहरणे असून, जिल्ह्यातील अनेक तरुण या रौलेटच्या जाळ्यात फसलेले आहेत. त्यामुळे ऑनलाइन जुगाराचे जाळे तरुणांना संकटात नेत आहे. त्याचप्रमाणे अनेक ऑनलाइन गेमच्या मोहाला चिमुकलेही बळी पडत आहेत. गेम खेळताना बंदूक, कपडे, गाड्या आदी खरेदी करताना लहान मुले त्यांच्या पालकांच्या बँक खात्यातून हजारो, लाखो रुपये ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करीत आहेत. ही बाब पालकांच्या लक्षात येते. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कारण खरे पैसे देऊन चिमुकल्यांनी व्हर्च्युअल खरेदी केलेली असते. त्यामुळे याबाबत कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न पालकांना पडतो. या बाबींमुळे आज ऑनलाइन जुगार व गेमच्या आहारी जाऊन तरुणांसोबत लहान मुलेही आर्थिक फसवणुकीस बळी पडत आहेत. अनेकदा मनोरंजन, करमणुकीच्या नावाखाली ऑनलाइन गेम-जुगार खेळवणारे पळवाटा काढत असतात. त्यामुळे या वाटा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news