नाशिक : रस्त्यावर कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या | पुढारी

नाशिक : रस्त्यावर कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
आंबे बहुला गाव ते विल्होळी डॅम जवळ रस्त्यावर मंगळवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेत बिबट्या आढळला. वनविभागाचे कर्मचारी यांनी पंचनामा करून मृत कुजलेला बिबट्या गंगापुर डॅम परिसरातील वन विभागाच्या नर्सरीत ठेवला.

विल्होळी डॅम परिसरात रस्त्यालगत कुजलेल्या अवस्थेत बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाचे वनरक्षक विजय पाटील, वाहन चालक अशोक खांडझोडे व दोन वन मजुर मंगळवारी रात्री ८ . ३० वाजता घटना स्थळी दाखल झाले. मृत झालेला बिबट्या आठ दिवसांपूर्वी मृत झालेला असावा व सुमारे दहा वर्षाचा असावा अशी माहिती वनरक्षक विजय पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button