नाशिकमध्ये पाणीबाणी ; ‘या’ भागात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा नाही | पुढारी

नाशिकमध्ये पाणीबाणी ; 'या' भागात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 1200 मिमी व्यासाच्या पीएससी सिमेंटच्या जलवाहिनीला थेट गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सातपूर, नवीन नाशिक व नाशिक पश्चिम विभागातील काही प्रभागांमध्ये बुधवारी (दि.20) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरुवारी (दि.21) सकाळी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविले आहे.

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 व 26 आणि 27 मधील भागश: चुंचाळे, दत्तनगर, माउली चौक, नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 7 मधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवाद नगर, दादोजी कोंडदेव नगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाउस परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचित नगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांती निकेतन आदी परिसर, प्रभाग 12 मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजात नगर, समर्थनगर, कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, पी.टी.सी. संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांतीनगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुलनगर, मिलिंदनगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्रीनगर, सहवासनगर, कालिकानगर, गडकरी चौक व गायकवाड नगर परिसर. तसेच नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक 25 मधील इंद्रनगरी परिसर, कामटवाडा, धन्वंतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मीनगर, दत्तनगर, मटालेनगर व प्रभाग क्रमांक 26 मधील शिवशक्तीनगर, आयटीआय पुलाजवळील परिसर बॉम्बे टेलर, प्रभाग 27 मधील चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबानगर, अंबड मळे परिसर, प्रभाग 28 मधील खुटवडनगर, माउली लॉन्स, वावरेनगर, अंबड गाव, महालक्ष्मी नगर आदी परिसरात बुधवारी (दि.20) संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही.

हेही वाचा :

Back to top button