जळगाव : विमानतळावर महापौरांनी केले शरद पवार यांचे स्वागत | पुढारी

जळगाव : विमानतळावर महापौरांनी केले शरद पवार यांचे स्वागत

जळगाव: पुढारी वृत्तसेवा ; एका दिवसाच्या जिल्हा दौ-यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विमानतळावर महापौर जयश्री महाजन यांनी स्वागत केले.

खासदार शरद पवार हे शुक्रवारी (दि.१५) सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने जिल्हा दौर्‍यावर जळगावात दाखल झाले आहेत. त्यांचे आगमन झाल्यानंतर महापौरांनी त्यांचे शहरवासियांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीत धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दिवंगत माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच शिवतीर्थ मैदानावर आयोजीत लोकसंघर्ष मोर्चा प्रसंगी त्यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे, रोहिणी खडसे खेवलकर, जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस रविंद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार मनीष जैन आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा :

Back to top button