नाशिक : सातपूरला रस्त्यांची आयुक्तांकडून पाहणी | पुढारी

नाशिक : सातपूरला रस्त्यांची आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सातपूर विभागातील गावठाण परिसर तसेच गंगापूर रोड परिसरातील रस्त्यांची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी केली. यावेळी त्यांनी बांधकाम विभागाला विविध कामांच्या सूचना दिल्या.

पाहणी दौर्‍यात आयुक्तांनी सातपूर प्रभाग क्र. 8 मधील भोसला मिलिटरी कॉलेज गेट ते आसारामबापू आश्रम पुलापर्यंत डीपी रस्त्याची पाहणी केली. आसारामबापू आश्रमाजवळील पुलावरून गोदावरी नदीपात्राची पाहणी करून विविध सूचना बांधकाम विभागाला दिल्या. गंगापूर रोड पाइपलाइन सिग्नल रिलायन्स पेट्रोलपंपापर्यंतच्या डीपी रस्त्याची पाहणी करून शिवाजीनगर, श्रमिकनगर भागातील शिवछत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी करीत विविध प्रकारच्या कामांच्या सूचना दिल्या. तसेच श्रमिकनगर येथील आयटीआय कॉलनी भागातील रस्त्याची पाहणी करून पुढे सातपूर गावठाणलगतच्या मळे परिसरातील रस्ते व अंबड लिंक रोडला जाणार्‍या रस्त्याला जोडणार्‍या रस्त्यांची पाहणी करीत सूचना केल्या. सिडको विभागातील नवशक्ती चौकातील नाल्याजवळ बांधण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक कामाची पाहणी केली. तसेच हेडगेवार चौक पुलापासून ते नंदिनी नदीपर्यंतच्या भागाची पाहणी केली. तोरणानगरपर्यंतच्या रस्त्यांची पाहणी करून सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या. यावेळी आयुक्त पवार यांच्या समवेत शहर अभियंता नितीन वंजारी, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button