नाशिक : पंचवटीत मारुती कारने घेतला पेट | पुढारी

नाशिक : पंचवटीत मारुती कारने घेतला पेट

पंचवटी ,पुढारी वृत्तसेवा : पंचवटीतील तारवाला नगर येथील सिग्नलवर चालत्या मारुती ८०० कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद येथील रहिवाशी रामदास तुकाराम काकड हे आपली मारुती ८०० (क्रमांक एक एच १५ ई एफ ९१६४) या कारमधून पंचवटीकडून घराकडे परतत होते.

दिंडोरी रोडवरील तारवाला नगर सिग्नल जवळ त्यांच्या मारूती कारने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत काकड हे कारमधून उतरले उतरले. येथील एका नागरिकाने सदर बाब अग्निशामक दलाला कळविली. काही वेळातच अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले आणि लिडींग फायरमन अर्जुन पोरजे, फायरमन नाना गांगुर्डे, शिवाजी फुगट, वाहनचालक अभिजित देशमुख यांनी आग आटोक्यात आणली. यावेळी स्टेशन ऑफिसर आर. एम. बैरागी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचलतं का?

Back to top button