नाशिक : महाराष्ट्रातील प्रमुख साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्रीराम शेटे तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी बस्ते यांची निवड करण्यात आली आहे.
कादवाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत श्रीराम शेटे यांनी 35 पैकी 26 मते मिळवत परिवर्तन पॅनलचे संपतराव वक्ते यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत कादवा विकास पॅनलने १७ जागांवर विजय मिळवत कादवा वर सत्ता कायम राखली आहे.