नाशिक : रेशन दुकानदारांच्या ई-पॉस मशीनच्या समस्या सोडवा; प्रधान सचिवांशी चर्चा

मुंबई : अन्न व पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करताना रेशन दुुकानदार संघटनेचे पदाधिकारी.
मुंबई : अन्न व पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करताना रेशन दुुकानदार संघटनेचे पदाधिकारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : ई-पॉस मशीनमधील समस्या तातडीने सोडवाव्यात, नेटवर्कची अडचण दूर करावी, रेशन कार्डधारकांसाठीची उत्पन्न मर्यादा वाढवावी आदी मागण्या रेशन दुकानदारांनी अन्न व पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांच्याकडे केल्या. त्यावर याबाबत अन्न व पुरवठामंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी दिले.

मुंबई येथील मंत्रालयातील वाघमारे यांच्या दालनात ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर फेडरेशनच्या सदस्यांची बैठक पार पडली. यात फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांनी दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, धान्य वितरणावेळी रेशनला तूट मंजूर करावी, राज्यात परवानाधारकांचे मोफत धान्याचे अनुदान त्वरित जमा करावे आदी मागण्या केल्या. बैठकीला सहसचिव धनंजय तुंगार, कक्ष अधिकारी नेत्रा मानकामे, अस्मिता पाटील, गणपत डोळसे-पाटील, बाबूराव ममाणे, निवृत्ती कापसे, शहाजी लोखंडे, विजय गुप्ता, आप्पासाहेब तोडकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news