रामनवमी : नाशिकमधील राममंदिरे सजली ; भक्तांमध्ये उत्साहाला उधाण

रामनवमी : नाशिकमधील राममंदिरे सजली ; भक्तांमध्ये उत्साहाला उधाण
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रामनवमीनिमित्त शहरातील राममंदिरे सजली आहेत. नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेले श्री काळाराम मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाले आहे. कोरोना निर्बंधमुक्तीमुळे दोन वर्षांनी रामनवमीचा उत्सव साजरा होणार असल्याने रामभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

पंचवटीतील काळाराम मंदिरात रामनवमीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज रविवारी (दि.10) पहाटेपासून मंदिर संस्थांनतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सवाचा सोहळा होणार आहे. दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

आगर टाकळी येथील श्री मारुती देवस्थान व राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी मठात दुपारी 12 वाजता रामनवमी उत्सव आणि मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भजनी मंडळातर्फे भजनांचा तर सायंकाळी 6 ला कल्पेश महाराज भागवत यांचे प्रवचन होणार आहे. याशिवाय रविवार कारंजा येथील गोरेराम लेनमधील गोरेराम मंदिर, पंचवटीतील अहिल्याराम व्यायामशाळा, सांडव्यावरील देवी परिसरातील मंदिरासह शहर-परिसरातील राम मंदिरे सजली आहेत. फुलांच्या हारांसह आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर-परिसर उजळून निघाला आहे.

राज्यपाल घेणार दर्शन…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोनदिवसीय नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. राज्यपाल कोश्यारी हे रविवारी (दि.10) सकाळी 8 ला पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथे दर्शन घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी शनिवारपासून (दि.9) मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तयारी सुरू केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news