नाशिक : ‘ती’ पत्रे समाजमाध्यमांपर्यंत आली कशी? विशेष शाखेकडून तपास सुरू | पुढारी

नाशिक : ‘ती’ पत्रे समाजमाध्यमांपर्यंत आली कशी? विशेष शाखेकडून तपास सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर पोलिस आयुक्तांनी 23 मार्च पोलिस महासंचालकांना बदली करण्यासाठी विनंती अर्ज केला होता. त्याचप्रमाणे 2 एप्रिल रोजी महसूल विभागातील कारभाराबाबत खळबळजनक आरोप करणारे पत्र लिहिले होते. दोन्ही पत्रे गोपनीय असतानाही समाजमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे ही पत्रे समाजमाध्यमांकडे कोणी पोहोचवली याचा शोध सुरू झाला आहे. त्यानुसार विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक सुरेखा पाटील या तपास करीत आहेत.

पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वैयक्तिक कारणामुळे आपली अकार्यकारी पदावर बदली करावी, अशी विनंती पोलिस महासंचालकांकडे 23 मार्च रोजी केली होती. हे पत्र गोपनीय असतानाही ते 10 दिवसांनी समाजमाध्यमांमध्ये पोहोचली होती. त्यानंतर 2 एप्रिल रोजी पाण्डेय यांनी पुन्हा पोलिस महासंचालकांना पत्र लिहून महसूल विभागातील अधिकारी आरडीएक्स, तर कार्यकारी दंडाधिकारी डिटोनेटेरसारखे असून, भूमाफिया त्यांचा जिवंत बॉम्ब म्हणून वापर करत असतात. त्यांच्यामुळे जागामालकांची फसवणूक होत असून, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांवरही गुन्हे दाखल आहे.

त्यामुळे महसूल विभागाचे अधिकार काढून घ्यावेत त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा हा संपूर्ण नाशिक पोलिस आयुक्तालय जाहीर करावा, असा प्रस्ताव पत्रात सुचवला होता. हे पत्रदेखील दुसर्‍याच दिवशी व्हायरल झाल्याने पोलिस विभागाच्या गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या दोन्ही पत्रांना समाजमाध्यमांमध्ये कोणी व्हायरल केले याचा शोध घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार विशेष शाखेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button