अमित ठाकरे लवकरच नाशिक दौर्‍यावर | पुढारी

अमित ठाकरे लवकरच नाशिक दौर्‍यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुढील पंधरवड्यात नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने ते मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक घेतील. दौर्‍याच्या पूर्वतयारीसंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेची मंगळवारी (दि.5) ‘राजगड’ येथे बैठक झाली.

बैठकीत अमित ठाकरे यांच्या आगामी दौर्‍याचे नियोजन, मनविसे संघटनेची पुनर्बांधणी, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये मनविसेचे महाविद्यालय युनिट स्थापन करणे, नाशिक शहरातील सर्व महाविद्यालयांबाहेर मंडप लावून नूतन सभासद नोंदणी करणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची युवती विंग स्थापन करणे, नाशिक शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट आदी विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहराध्यक्ष संदेश जगताप, सिद्धेश सानप, मयूर रावळे, मेघराज नवले, सार्थक देशपांडे, अविनाश जाधव, अक्षय गवळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button