नाशिक : तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणाऱ्यास केले जेरबंद | पुढारी

नाशिक : तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणाऱ्यास केले जेरबंद

नाशिक : शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे.

गोविंद संजय साबळे (२०, रा. भोर मळा, नाशिकरोड) असे या संशयिताचे नाव आहे. गोविंद यास दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. मात्र तरीदेखील तो विनापरवानगी शहरात वास्तव्य करीत होता. त्यास रविवारी (दि.३)बिटको रुग्णालयाजवळून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button