नाशिकमध्ये ईडीचे छापासत्र? नवाब मलिक यांच्या निकटवर्तीयांची चौकशी? | पुढारी

नाशिकमध्ये ईडीचे छापासत्र? नवाब मलिक यांच्या निकटवर्तीयांची चौकशी?

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सध्या ईडीच्या ताब्यात असलेले राज्याचे अल्पसंख्याकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या निकटवर्तीयांच्या चौकशीसाठी ईडीच्या अधिकार्‍यांनी नाशिकमधील काही भंगार व्यावसायिकांकडे विचारपूस केल्याचे वृत्त आहे.

ना. नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांच्या व्यवहारांची तपासणी केली जात असून, त्यांच्या निकटवर्तीयांकडेही चौकशी केली जात आहे. ना. मलिक यांचा भंगाराशी संबंधित व्यवसाय असून, नाशिकच्या अंबड-लिंक रोड भागातील भंगार व्यावसायिकांपैकी काही जण त्यांचे निकटवर्तीय असल्याचे कळते. त्यांच्या चौकशीसाठी ईडीच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी नाशिकमध्ये धडक मारल्याची चर्चा आहे.

काही भंगार व्यावसायिकांची अधिकार्‍यांनी कसून चौकशीही केल्याचे कळते. त्यांचा ना. मलिक यांच्याशी काही संबंध आहे का, त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याची माहिती घेण्यात आल्याचे कळते. मात्र, या प्रकरणी पोलिस वा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. नाशिकमधून कोणालाही ताब्यात घेतल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा :

Back to top button