मालेगाव बॉम्बस्फोटातील आणखी एक साक्षीदार फितूर | पुढारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील आणखी एक साक्षीदार फितूर

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसने सादर केलेला जबाब आपला नाही. तपास यंत्रणेने आपल्यावर दबाव आणला. आपण कोणत्याही आरोपीला ओळखत नाही, असे सांगत या खटल्यातील साक्षीदार असलेला माजी सैनिक फितूर झाला. दरम्यान, या प्रकरणातील फितूर साक्षीदारांची संख्या आता वीस इतकी झाली आहे.

29 सप्टेंबर 2008 मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करून त्यांच्यावर मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याची सुनावणी सध्या सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button