नाशिक : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार | पुढारी

नाशिक : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

नाशिक (ओझर) पुढारी वृत्तसेवा : ओझर टाउनशीप परिसरातील मेनगेट येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. 28) सकाळी उघडकीस आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्ग (क्र.3) वरील एचएएल वसाहतीतील बंद प्रवेशद्वार क्र. 1 समोर रविवारी (दि.27) रात्री ते सोमवार (दि.28) च्या पहाटेच्या दरम्यान बिबट्याचा अपघात झाला असल्याची शक्यता आहे. तर मादी बछड्याचे वय अंदाजे सहा महिने आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी ओझर पोलिस ठाणे व वनविभागाला माहिती कळविल्यानंतर कर्मचारी व चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

सहायक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव येथील वनपरिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी, पी. पी. सोमवंशी, वनरक्षक व्ही. आर. टेकणार, वनमजूर वसंत देवरे, वाहनचालक अशोक शिंदे यांच्या मदतीने पंचनामा केला. यावेळी वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर, श्रीकांत शेजवळ, राहुल गायखे, सौरभ जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button