नाशिक : विनापरवानगी शहरात फिरताना आढळल्याने तडीपारास अटक | पुढारी

नाशिक : विनापरवानगी शहरात फिरताना आढळल्याने तडीपारास अटक

नाशिक : तडीपार गुंडास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. रोहित ज्ञानेश्वर सोळसे (२२, रा. भद्रकाली) असे या संशयिताचे नाव आहे. भद्रकालीतील घासबाजार समोर रोहित सोळसे हा फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने रोहितला पकडले. रोहित यास डिसेंबर २०२१ पासून वर्षभरासाठी तडीपार केले आहे. तरीदेखील तो विनापरवानगी शहरात फिरताना आढळून आला. त्याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button