रुपाली चाकणकर यांच्यासाठी महिला आयोग नव्हे, तर राष्ट्रवादी आयोग ; आ. देवयानी फरांदे | पुढारी

रुपाली चाकणकर यांच्यासाठी महिला आयोग नव्हे, तर राष्ट्रवादी आयोग ; आ. देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री दिशा सॅलियनच्या मृत्यूला वर्ष झाले असताना तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने सरकारला जाब विचारणे आवश्यक असताना आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी आयोग असल्यासारख्या कामकाज करत असल्याची खोचक टीका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांनी रविवारी (दि.27) केली.

अभिनेत्री दिशा सॅलियन बदनामी प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आ. फरांदे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सरकार व राज्य महिला आयोगावर चौफेर टीका केली.

त्या म्हणाल्या की, दिशा सॅलियन प्रकरणी राज्य सरकार माहिती दडवत आहे. या प्रश्नी आवाज उठविणार्‍या भाजपच्या नेत्यांवर सरकार गुन्हे दाखल करत असून, हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असल्याची टीका फरांदेंनी केली. राज्य सरकार हे चुकीच्या पद्धतीने काम करत असून, त्यांच्या एका मंत्र्यांमुळे युवतीने आत्महत्या केली. दुसर्‍या मंत्र्यांविरोधात घरातील महिलेने तक्रार केली आहे. अशावेळी चाकणकरांनी आरोप असलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकताना महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी उपाययोजनांची मागणी सरकारकडे केली पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा :

Back to top button