नाशिक : डॉ. सुवर्णा वाजेंसह कार सॅनिटायझरने जाळली ; बाळासाहेब म्हस्केची पोलिसांना माहिती | पुढारी

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजेंसह कार सॅनिटायझरने जाळली ; बाळासाहेब म्हस्केची पोलिसांना माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्यासह त्यांची कार सॅनिटायझरने जाळल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के याने ही माहिती पोलिसांना दिली आहे.

वाडीवर्‍हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या कारमध्ये महिलेचा सांगाडा आढळून आला होता. या प्रकरणी वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून संशयावरून डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजेला अटक केली. त्याच्याकडील चौकशीतून ठोस माहिती मिळाली नव्हती. मात्र, पोलिसांनी बाळासाहेब म्हस्के यास अटक केली. त्याच्याकडील चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या चौकशीत सॅनिटायझर दोन ठिकाणांहून घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी एक ठिकाण म्हस्केने पोलिसांना दाखवले असून, दुसरे ठिकाण शोधणे बाकी आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळी सापडलेला चाकू मारेकर्‍याने कुठून आणला, गुन्ह्याच्या वेळी म्हस्केने वापरलेले वाहन शोधून ते जप्त करण्याची प्रक्रिया बाकी आहे. बुधवारी (दि.23) म्हस्केची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पोलिसांकडील युक्तिवादावरून म्हस्के यास पुन्हा सहा दिवसांची कोठडी वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा ;

Back to top button