Accident : डांगसौंदाणे-ततानी रस्त्यावर अपघात, दोन ठार | पुढारी

Accident : डांगसौंदाणे-ततानी रस्त्यावर अपघात, दोन ठार

पुढारी वृत्तसेवा : डांगसौंदाणे : डांगसौंदाणे-ततानी रस्त्यावर मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात घुलमाळ (साल्हेर) येथील दोघा आदिवासी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. (Accident)

मोहन मंगळु बागुल (20) दिनेश नामदेव ठाकरे (18) दोघे रा. घुलमाळ ता. बागलाण हे तरुण डांगसौंदाणे येथून आपल्या गावी जात असताना डांगसौंदाणे शिवारातील रघुनंदन फार्म च्या समोर रात्रीच्या वेळेस हिरो कंपनीची स्प्लेंन्डर मोटरसायकल क्रमांक MH41 BC 8556 या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत (Accident)दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सटाणा पोलिसांना स्थानिक नागरिकांनी कळविल्यानंतर सटाणा पोलिसांनी घटनास्थळी येत दोघे मृतदेह डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले., पुढील तपास सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनुमोलवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. जयंतसिंग सोळंकी करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button