ज्या शिव्या द्यायच्या त्या एकदाच देऊन टाका : किरीट सोमय्या | पुढारी

ज्या शिव्या द्यायच्या त्या एकदाच देऊन टाका : किरीट सोमय्या

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजार वेळा तुरुंगात टाकले तरी महाराष्ट्र घोटाळामुक्त करू, असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांताक्रूज पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याच वेळी मराठीत कोणती डिक्शनरी आहे का ते पाहा आणि जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत त्या मला एकदाच देऊन टाका. रोज माझ्या आईला संताप नको, असे प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिले.

कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीला हजर रहाण्यासाठी पोलिसांनी बजावलेल्या समन्सनुसार किरीट सोमय्या हे रविवारी पोलिसांसमोर हजर झाले. यावेळी त्यांना दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची प्रत देत 14 दिवसांत आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सांताक्रूझ येथील हसनाबाद गल्लीतील बंगल्यावर गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सोमय्या गेले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात सोमय्याना नुकतेच समन्स पाठविण्यात आले होते. त्यात लेखी निवेदनासह 15 दिवसांत चौकशीला हजर रहा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे नमूद करण्यात आले होते.

Back to top button