जळगाव : अवैध गौण खनिज प्रकरणी लाच घेणारा तलाठी ताब्यात | पुढारी

जळगाव : अवैध गौण खनिज प्रकरणी लाच घेणारा तलाठी ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : तापी नदीमधून अवैध वाळू वाहतुकीसाठी व वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच घेताना चोपडा तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तलाठ्यास रंगेहाथ अटक केली.

चोपडा तालुक्यातील मितावली येथील तक्रारदार यांचे वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरवर तापी नदीमधून वाळू वाहतुकीसाठी व वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे चोपडा तालुक्यातील देवगाव सजा येथील तलाठी भूषण विलास पाटील (32) यांनी दरमहा दहा हजारांची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्याप्रमाणे डीवायएसपी शशिकांत एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत लाचेचा पहिला दहा हजार रुपयांचा हप्ता तलाठी याने स्वतः तहसील कार्यालय चोपडा आवारात स्वीकारला. या प्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव अधिक तपास करीत आहेत.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button