जळगाव : हातात लाटणे घेवून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक महापालिकेवर धडकल्या | पुढारी

जळगाव : हातात लाटणे घेवून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक महापालिकेवर धडकल्या

जळगाव : पुढारी ऑनलाइऩ : थकीत मानधन मिळावे यासह इतर विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिला यांनी हातात लाटणे घेवून महापालिकेवर धडक मोर्चा काढला.

कोरोना काळात प्रशासनाच्या बरोबरीने आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी काम केले आहे. परंतू ठरल्याप्रमाणे कामाचा मोबादला शासनाकडून मिळालेला नाही. प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने करण्यात येऊनही मागण्या मान्य होत नसल्याने, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती व सीसीटीव्हीच्या नेतृत्त्वात गटप्रवर्तक व आशासेविकांनी महापालिकेवर लाटणे मोर्चा काढला. लाटणे हातात धरुन अशा सेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.  जर मागण्या मान्य झाल्या नाही तर लाटण्याने प्रशासनाला धडा शिकवू असा इशाराही आंदोलानात दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button