

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा
रेल्वेस्थानकावरील फलाट क्र. 1 वरून दोनवर रेल्वे रूळ ओलांडताना ताप्ती गंगा-छपरा-सुरत एक्स्प्रेसने जबर धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला.
मृत तरुणाचे वय अंदाजे 35 वर्षे इतके असून, या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तत्काळ रेल्वे विभागातील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली अग्रवाल यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.