Jalgaon Election : जिल्ह्यात वाढणार दहा गट ; जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी | पुढारी

Jalgaon Election : जिल्ह्यात वाढणार दहा गट ; जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात(Jalgaon Elections) गट व गणांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा सादर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. जिल्ह्यात 10 गट व 20 गण वाढणार आहेत. जिल्ह्यात निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

येत्या 20 मार्च रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत संपुष्टात येत आहे. निवडणुका (Jalgaon Elections) वेळेत होणार असल्याचे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. अधिवेशनात गट व गण रचना वाढीच्या मंजूर करण्यात आलेल्या विधेयकावर राज्यपालांची मोहोर उमटल्याने जिल्ह्यात 10 गट व 20 गण वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात जि. प सदस्यांची संख्या आता 67 वरून 77 होणार आहे. त्यात संभाव्य गटवाढीमध्ये चाळीेसगावात दोन, अमळनेर, चोपडा, रावेर, जामनेर, यावल, धरणगाव, पाचोरा येथे प्रत्येकी एक गट वाढण्याची शक्यता असून, 20 गणदेखील वाढणार आहेत. बर्‍याच तालुक्यात गट आणि गणांमध्ये फेरबदल होणार असून, त्यामुळे राजकीय समीकरणे बदलून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षाची कसोटी लागणार आहे.

राजकीय नेत्यांची कसोटी 

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत राजकारण बदलले आहे. भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आजवर जिल्हा परिषदेत भाजप नेते गिरीश महाजन व खडसे यांंचा दबदबा राहिला आहे. मात्र, बदलत्या राजकारणामुळे दोन्ही नेत्यांची कसोटी लागणार आहे. खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. भाजप गेल्या चार पंचवार्षिकपासून जिल्हा परिषदेत सत्तेत आहे. मात्र, राजकीय उलथापालथीनंतर राजकीय गणिते बदलल्याने यावेळी गिरीश महाजनांचा कस लागणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असुन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार शिवसेनेचे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button