Leopard skin : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या सात जणांच्या आवळल्या मुसक्या | पुढारी

Leopard skin : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या सात जणांच्या आवळल्या मुसक्या

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : शहापूर वन विभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी (Leopard skin)करणार्‍या सात आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींमध्ये इगतपुरीतील तीन, त्र्यंबकेश्वरमधील दोघांचा समावेश आहे. यामुळे दोन्ही तालुक्यांत खळबळ माजली आहे. 2018 मध्ये अशाच एका घटनेत इगतपुरी तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही मोठ्या हिमतीने काही आरोपींना जरेबंद केले होते.

या सापळ्यात आरोपी काळू सोमा भगत (36), अशोक सोमा मेंगाळ (29, दोघे रा. भावली, ता. इगतपुरी), योगेश लक्ष्मण अंदाडे (26, रा. फांगुळगव्हाण, ता. इगतपुरी), मुकुंदा सोमा सराई (55, रा. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर), गोटीराम एकनाथ गवारी (34, रा. सामोडी, ता. त्र्यंबकेश्वर), रघुनाथ शंकर सातपुते (34, रा. मोखाडा, ता. जव्हार, जि. पालघर), अर्जुन गोमा पानेडा (28, रा. चाफ्याचा पाडा (शिरोळ) ता. शहापूर, जि. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Leopard skin)

19 जानेवारीला वनपरिक्षेत्र वाशाळामधील वाशाळा गावाच्या परिसरात वन्य प्राणी बिबट्याच्या कातडीचा व्यापार होत असल्याच्या गुप्त बातमीवरून शहापूर वन विभागाने सापळा रचला होता. यात शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वन्य प्राणी मित्र संतोष जगदाळे यांनी बनावट ग्राहक बनून आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी भेटण्याचे ठिकाण वाशाळा इथून बदलून इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी मंदिर परिसरात निश्चित केले. तेथे त्यांना बिबट्याच्या कातड्याचा व्हिडिओ मोबाइलवर दाखवून, त्याचा व्यवहार करायचा असल्याचे सांगितले. परंतु, त्या दिवशी आरोपींनी व्यवहार केला नाही. त्यानुसार गुन्ह्यात सहभागी आरोपींनी बनावट ग्राहकाला मोबाइलवर कॉल करून बिबट वन्य प्राणी कातड्याची विक्री करण्याचे ठरविले. (Leopard skin)

आरोपींवर वन्य जीव अधिनियमचे कलम (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संयुक्त सापळा कारवाईत वनपाल एन. एस. श्रावणे, व्ही. एस. गायकवाड, एस. बी. गाठे, वनरक्षक वाय. पी. पाटील, पी. डी. बेलदार, जी. एस. भोये, एस. एल. शिंदे, बी. पी. वसावे, एस. एस. अहिरे, डी. डी. ठोंबरे, यू. एम. घायवट, बी. एस. शेळके, व्ही. व्ही. खेडकर, आर. एन. मागी, जी. एस. खेमनर, एस. डी. धोंगडे, एम. टी. ओतडे, डी. पी. ऐवळे, सी. एस. खाडे, आर. एन. देवकत्ते, आर. एस. महाले आदींनी सहभाग घेतला.

गोवा : १६ मतदारसंघातून २७ महिला उमेदवार रिंगणात; शिवोली मतदारसंघात सर्वाधिक चौघीजणी आमनेसामने

आणि संशयित जाळ्यात अडकले
बुधवारी (दि. 2) व्यवहारासाठी पहिल्यांदा घाटनदेवी मंदिर परिसर ठरला होता. त्यानंतर लगेच ठिकाण बदलून उभाडे गावाजवळील घोटी-सिन्नर रस्त्यालगत ठरले होते. त्यानुसार उपवनसंरक्षक वसंत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाशाळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल गोदडे, खर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख, शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांच्यासह कर्मचार्‍यांनी संयुक्त सापळा रचला. बनावट ग्राहक बनून आरोपीसमोर गेले असता, बिबट्याच्या कातड्याचा व्यवहार करताना सात आरोपी आढळले. त्यांच्याकडे बिबट्याच्या कातडीचा 1 नग आणि चार दुचाकी होत्या. मुद्देमालासह त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button