Murder : गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून ; पाच संशयितांना बेड्या | पुढारी

Murder : गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून ; पाच संशयितांना बेड्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : पाचोरा शहरात दुचाकीचा कट लागल्याने तरुणास जबर मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा चोपरने भोसकून खून (Murder) करण्यात आला आहे. पाचोरा शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळेसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली.

पाचोरा येथे भडगाव रोडवरील साई मंदिरा जवळ या घटनेतील मयत(Murder) भूषण नाना शेवरे वय (२२)  व संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी वय (२२)  एकमेकांच्या वाहनाचा कट लागल्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर संशयित आरोपीने मयत भुषण नाना शेवरे यास पुनगाव रोडवरील बुर्‍हानी इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान फोन करून बोलवले. संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयुर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहुल पाटील, चेतन उर्फ स्टोयलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील, पवन पाटील सर्व रा.पाचोरा यांनी मयत भूषण शेवरे व सनी देवकर यास लाठ्या काठ्यांनी, लाकडी दांडक्याने, फायटरने मारहाण केली. भूषण नाना शेवरे याला चॉपरने पोटात भोसकले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असता तिथे भूषण नाना शेवरे याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.(Murder)

पाचोरा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ हालचाली करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच जखमींच्या फिर्यादीवरून लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील आणि पवन पाटील (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुरनं ४२/२०२२ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील आणि अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Back to top button