जळगाव : भुसावळ जुन्या एमआयडीसीमधील कंपनीत ३ लाखाची चोरी | पुढारी

जळगाव : भुसावळ जुन्या एमआयडीसीमधील कंपनीत ३ लाखाची चोरी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील जुन्या एमआयडीसीत असणाऱ्या जय केबल अँड इंडस्ट्रीजमध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करत पाच लाखांच्या कॉपरसह रोख रक्कमेवर डल्ला मारला. भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत आठवडाभरातील ही दुसरी चोरीची घटना आहे.

शनिवार  (दि. २९) रोजी  भुसावळ येथील जुन्या ‘एमआयडीसी’मधील जय केबल अँड इंडस्ट्रीज या कंपनीच्‍या गेटचे कुलूप तोडून चाेरट्यांनी आत प्रवेश केली. २ लाख ९२ हजाराचे कॉपर व रोख रक्कम २५ हजार रुपयांची राेकड लंपास केली.  या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळी नऊ वाजता कंपनीचे मालक नरेश कुमार हे कंपनी मध्ये आले. त्यांना चाेरी झाल्‍याचे निदर्शनास आले.  त्‍यांची याची माहिती पोलीसांना दिली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा

Back to top button