जळगाव : कंपनीची संरक्षक भिंत फोडून २५ क्विंटल कापसावर चोरट्यांनी मारला डल्ला

जळगाव : कंपनीची संरक्षक भिंत फोडून २५ क्विंटल कापसावर चोरट्यांनी मारला डल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : धरणगाव जळगाव रोडवर असलेल्या एका कापसाच्या जिनिंग कंपतीतून अज्ञात चोरट्यांनी संरक्षक भिंत फोडून २५ क्विंटल कापूस चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीला आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नेांदविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव जळगाव रोडवर महाविर कॉटन नावाच्या कंपनीत कापूस खरेदी विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करून साठा करण्यात आला आहे. रविवारी २३ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भींत फोडून सुमारे २ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा २५ क्विंटल कापूस चोरून नेला. हा प्रकार सोमवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. कंपनीचे मालक सुभाष काशिनाथ पाटील याचा मुलगा देवा पाटील यांनी धरणगाव पोलीसांना घटनेची माहिती दिली.

धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्यासह गजानन पाटील, संदीप पाटील, जितेंद्र भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चोरी झाल्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात देवा पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. संरक्षण भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी वाहनाच्या मदतीने हा कापूस चोरून नेला आहे. धरणगाव पोलीस कर्मचारी हे कसून चौकशी करत आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news